शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चोरीसाठी आला, हृदयविकाराने मेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 23:55 IST

कºहाड : बंगल्यात चोरी करायला गेलेल्या चोरट्याचा त्याचठिकाणी हृदयविकाराने मृत्यू झाला, तर मृतदेह तेथेच सोडून त्याचे साथीदार पसार झाले. कºहाडनजीक गजानन हौसिंग सोसायटीमध्ये घडलेली ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कºहाडनजीक गजानन हौसिंग सोसायटीमध्ये जयराम जोशी यांचा बंगला आहे. जोशी हे पॉलिश पेपरचे पश्चिम महाराष्ट्रातील ...

कºहाड : बंगल्यात चोरी करायला गेलेल्या चोरट्याचा त्याचठिकाणी हृदयविकाराने मृत्यू झाला, तर मृतदेह तेथेच सोडून त्याचे साथीदार पसार झाले. कºहाडनजीक गजानन हौसिंग सोसायटीमध्ये घडलेली ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कºहाडनजीक गजानन हौसिंग सोसायटीमध्ये जयराम जोशी यांचा बंगला आहे. जोशी हे पॉलिश पेपरचे पश्चिम महाराष्ट्रातील मुख्य वितरक असून, बंगल्यातच त्यांनी ‘पायस एंटरप्रायजेस’ नावाचे गोदाम व त्यांचे कार्यालय सुरू केले आहे.संबंधित बंगल्यात कोणीही वास्तव्यास नसते. जोशी नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास बंगल्यात आले असता पोर्चमध्ये कोणीतरी अस्ताव्यस्त पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता संबंधिताचा मृत्यू झाला असल्याचे त्यांना समजले. त्यामुळे जोशी यांनी याबाबतची माहिती कºहाड शहर पोलिसांत दिली. माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, कºहाड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद जाधव यांनी कर्मचाºयांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता जोशी यांच्या बंगल्याचा मुख्य दरवाजा कटावणीने उचटकल्याचे दिसून आले. तसेच पहिल्या मजल्यावरील कार्यालयाचा दरवाजाही कटावणीने उचकटण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येत होते.बंगल्याच्या पोर्चमध्ये मृतावस्थेत पडलेल्या व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची शक्यता वैद्यकीय अधिकाºयांनी व्यक्त केली आहे. तसेच संबंधित व्यक्ती चोर असावी, असा पोलिसांचा कयास आहे. संबंधिताच्या खिशात कºहाडातील एका सिनेमा थिएटरचे रात्रीच्या ‘शो’चे तिकीट आढळले असून, त्यावर तीन व्यक्तींसाठी असा उल्लेख आहे. त्यामुळे या चोरट्यासोबत अन्य दोघे असावेत, अशीही शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. घटनेची नोंद कºहाड शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.फुटेजसाठी पोलिसांची धावाधावजोशी यांच्या बंगल्याच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरा आहे. मात्र, नुकताच तो कॅमेरा बंद पडला असल्यामुळे तेथील हालचाली सीसीटीव्हीत कैद झालेल्या नाहीत. चोरट्याच्या खिशात चित्रपटगृहाचे तिकीट सापडल्यामुळे गुन्हे शाखेचे कर्मचारी मंगळवारी दुपारी संबंधित चित्रपटगृहात सीसीटीव्ही तपासण्यासाठी गेले होते. मात्र, त्याठिकाणी सीसीटीव्हीच नसल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा